मायदेशी परतल्यानंतर बोल्टची भावुक पोस्ट, भारतात पुन्हा परतण्याची केली इच्छा व्यक्त

मुंबई : राज्य आणि देशात गेल्या काही आठवड्यापासून कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा डोके वर काढले आहे. यादरम्यान भारतात सुरु असलेल्या आयपीएल स्पर्धेत कोरोनाचा शिरकाव झाल्याने स्पर्धा अर्ध्यातच स्थगित करण्यात आली. स्पर्धा रद्द झाल्यानंतर स्पर्धेत सहभागी झालेले अनेक विदेशी खेळाडू हे मायदेशी परतले आहे.

मायदेशी परतताच न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज आणि आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा सदस्य आसलेला ट्रेंट बोल्टने इन्स्टाग्राम या सोशल मीडीयावर एक भावुक पोस्ट करत भारतात पुन्हा परत येण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या पोस्टमध्ये बोल्ट म्हणाला की,’मुंबई इंडियन्स आणि आयपीएल स्पर्धा सोडुन येताना मला दु:ख झाले आहे. मात्र ज्या दु:खाचा सामना सध्या भारतीय करत आहे. त्यासमोर हे दु:ख काहीच नाही ‘ असे तो म्हणाला. या पोस्टमध्ये पुढे बोल्ट म्हणाला की,’ एक क्रिकेटपटू आणि माणुस म्हणुन भारतीय चाहत्याकडून मला प्रेम आणि पाठिंबा मिळाले त्याबद्दल मी खुप आभारी आहे.’

यासह बोल्ट म्हणाला की,’मी वाट बघतोय की भारतासारख्या सुंदर देशात पुन्हा कधी परत येता येईल.’ यावेळी त्याने मायदेशी सुखरुप पोहचवल्याबद्दल मुंबई इंडियन्सचे आभार मानले आहे. तसेच सर्वाना सुरक्षित राहण्याचा आणि काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. मायदेशी परतल्यानंतर न्युझीलंडच्या खेळाडूंना काही दिवस विलगीकरणात राहावे लागणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP