चित्रपटसृष्टी गाजवणारी बॉलिवूडची ‘चांदनी’ अनंतात विलीन

SRIDEVI

मुंबई: आपल्या नैसर्गिक कलेने केवळ हिंदीच नाही तर तामिळ, तेलगू आणि कन्नड चित्रपटसृष्टी गाजवणारी बॉलिवूडची ‘चांदनीला’ आज अखेरचा निरोप दिला. बॉलिवूडची पहिली सुपरस्टार श्रीदेवीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. संध्याकाळी ५ वाजून १३ मिनिटांनी पती बोनी कपूर यांनी श्रीदेवींच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला.

श्रीदेवींच्या अंत्यसंस्कारांच्या वेळी संजय कपूर, अनिल कपूर, अर्जुन कपूर, सोनम कपूर, मुली जान्हवी आणि खुशी हे कुटुंबीय उपस्थित होते. त्याशिवाय अमिताभ बच्चन, लारा दत्ता, विद्या बालन, अनुपम खेर, अर्जुन रामपाल यासारखे सेलिब्रिटीही उपस्थित होते. विलेपार्लेतील हिंदू स्मशानभूमीत श्रीदेवींच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

श्रीदेवीच्या अकाली निधनाने तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे आपल्या आवडत्या अभिनेत्रीचं अंतिम दर्शन घेण्यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

Loading...

 

Loading...