‘बलात्काराला बॉलिवुड, पाश्चिमात्य संस्कृती जबाबदार’ पाकिस्तानच्या पंतप्रधानांचं अजब विधान

इम्रान खान

इस्लामाबाद : नेहमीच भारताबद्दल आगपाखड करणाऱ्या पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केलेल्या आणखी वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. यावेळी त्यांनी लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये झालेल्या वाढीला, अश्लीलता जबाबदार असल्याचं वक्तव्य केलंय. तर त्यांनी यासाठी बॉलिवुड आणि पाश्चिमात्य संस्कृती जबाबदार असल्याचं सांगितलं आहे.

4 एप्रिलला ‘टेलीथॉन’ नावाच्या एका कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. यावेळी एका सामान्य नागरिकाने देशात वाढणाऱ्या बलात्कार आणि लैंगिक शोषणाच्या घटनांबाबत सरकारची योजना काय? प्रश्न विचारला असता इम्रान यांनी समाजाला ‘अश्लीलतेपासून’ स्वत:चं रक्षण करावं लागेल असं इम्रान खान म्हणाले होते. ते पुढे म्हणाले, ‘ही पर्दा कन्सेप्ट काय आहे? जेणेकरून आपल्याला मोह होऊ नये. प्रत्येक व्यक्तीमध्ये इच्छाशक्ती नसते. याच कारणामुळे आपल्या धर्मात शरीर झाकण्यावर जोर दिला जातो. जेणेकरून लाज कायम ठेवली जाईल. समाज प्रलोभन नियंत्रित ठेवता येईल. प्रत्येक व्यक्तीकडे स्वनियंत्रणाची ताकद नसते.’

या वक्तव्यानंतर इम्रान खान यांच्यावर प्रसारमाध्यमांमधून तसेच विविध क्षेत्रांतून टीका करण्यात येत आहे. यांनतर डॉन या पाकिस्तानी वृत्तपत्राने इम्रान खान यांच्या वतीने त्यांचा खुलासा छापला आहे. ‘दिल्लीला रेप कॅपिटल म्हणतात, यूरोपमध्ये अश्लीलतेमुळे कुटुंबव्यवस्था संपुष्टात आली. त्यामुळे, पाकिस्तानी लोकांनी अश्लीलता बंद करण्यासाठी सरकारची मदत केली पाहिजे.’ असे यामध्ये सांगण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या