या प्रसिद्ध अभिनेत्री सोबत सुशांत सिंह राजपूत लवकरच अडकणार लग्नाच्या बेडीत

bollywood-sushant-singh-rajput-and-kriti-sanon-going-to-get-marry

सुशांत सिंह राजपूत व कृति सेनन लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत.  याबाबतची अधिकृत घोषणा  अजून करण्यात आली नसून,  लवकरच याबाबत घोषणा करण्यात येईल.  खबर इंडिया या वेबसाईटने सुशांत व कृति च्या लग्नाविषयीचे वृत्त दिले आहे.

सुशांत व कृति राब्ता या सिनेमात एकत्र झळकले होते.  तेव्हा पासूनच त्यांच्या अफेअरची चर्चा बॉलीवूड मध्ये रंगू लागली.  ते दोघेही अनेक पार्ट्यांना व इवेन्टसला एकत्र असतात. या दोघांच्या नात्याविषयी त्यांच्या परिवारला देखील काहीच प्रोब्लेम नसल्यामुळे लवकरच सुशांत व कृति लग्नाच्या बेडीत अडकू शकतात.  सुशांत या आधी अंकिता लोखंडेसोबत जवळपास ६ वर्ष रिलेशनशिप मध्ये होता. काही दिवसापूर्वीच त्यांचे ब्रेकअप झाले आहे.

एम. एस. धोनी- द अनटोल्ड स्टोरी’, ‘डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी’ आणि ‘राबता’ या चित्रपटांमध्ये भूमिका साकारलेला सुशांत सध्या त्याच्या आगामी ‘केदारनाथ’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटातून सैफ अली खानची मुलगी सारा अली खान बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.