बॉलिवूड ‘क्वीन’ कंगना होणार आता काश्मीरची ‘राणी’

kangna

मुंबई : बॉलिवूड क्वीन अभिनेत्री कंगना रनौतआता लवकरच ‘मणिकर्णिका रिटर्न्स’मध्ये दिसणार आहे. ‘मणिकर्णिका’मध्ये झांसीच्या राणीची कथा दाखवली गेली होती. तर या आगामी ‘मणिकर्णिका रिटर्न्स’ या चित्रपटात काश्मीरच्या राणी कथा दाखवण्यात येणार आहे. चित्रपट निर्माते कमल जैन यांच्यासोबत फोटो शेअर करत कंगना रानौतने आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे.

कमल जैन सोबतचा फोटो शेअर करताना कंगनाने लिहिले की, ‘झाशीच्या राणीसारख्या अनेक वीरांगनांच्या शौर्याचा साक्षी आपला भारत देश आहे. अशीच आणखी एक समोर न आलेली वीर कथा म्हणजे काश्मीरच्या राणीची, ज्यांनी महमुद गजनवीला एकदा नव्हे तर दोनदा पराभूत केले. लवकरच कमल जैन आणि मी ‘मणिकर्णिका रिटर्न्स: दि लिजेंड ऑफ दिद्दा’ प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहोत.’

दरम्यान, अभिनेत्री कंगना रनौत तिच्या आगामी धकड चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. सध्या ती भोपाळमध्ये चित्रपटाच्या शुटिंगमध्ये आहे. आता ती भोपाळला गेली असताना कंगनाने मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचीही भेट घेतली. तेजस या चित्रपटामुळे काही काळापूर्वी कंगनाची संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी खास भेट झाली होती. त्यावेळी त्यांनी सांगितले होते की निर्मात्यांना चित्रपटाच्या संदर्भात भारतीय हवाई दलाची परवानगी हवी आहे. तिचे हे फोटोही बर्‍याच दिवसांपासून सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागले. कंगना रनौतसुद्धा वर्क फ्रंटवर तिच्या ‘थलावी’ या चित्रपटामुळे मुख्यबिंदू आहे. चित्रपटाचे शूटिंग संपले असून यावर्षी रिलीज होणार आहे.

महत्वाच्या बातम्या