बॉलीवूडची नजर सलमान खानच्या बहुप्रतिक्षीत ‘राधे’च्या प्रदर्शनाकडे

मुंबई : सलमान खान आणि ईद हे समीकरण म्हणजे ब्लॉकबस्टर चित्रपट हे समीकरण गेली अनेक वर्षे बॉलीवुडमध्ये यशस्वी ठरत आहे. मात्र मागील वर्ष याला अपवाद ठरले. कोरोनाच्या संसर्गामुळे सलमान खानचा राधे चित्रपट रखडला गेला.

मात्र सलमानच्या चाहत्यांची प्रतिक्षा आखेर संपणार आहे. कारण सलमानने दिलेल्या वचनाप्रमाणे येत्या १३ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. मात्र भारतात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होण्याची शक्यता नव्हती. मात्र सलमानने यावर उपाय म्हणून हा चित्रपट झी फ्लेक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

नुकतेच सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाला यु/ए प्रमाणपत्र बहाल केले आहे. या चित्रपटाचा कालावधी ११४ मिनीटाचा असणार आहे. त्यामुळे हा सलमानचा सर्वात कमी कालावधीचा चित्रपट ठरणार आहे. राधे या चित्रपटात सलमान खान सोबत दिशा पाटनी, जॅकी श्रॉफ, रणदीप हुडा हे कलाकार मुख्य भूमिकेत आहे. तर चित्रपटाचे दिग्दर्शन प्रभुदेवाने केले आहे.

महत्वाच्या बातम्या