जगात अक्षय कुमार चौथ्या स्थानावर; संपत्ती ऐकूण व्हाल थक्क!

टीम महाराष्ट्र देशा : सर्वाधिक मानधन घेणारा जगभरातील १० कलाकरांच्या यादीत अक्षय कुमार चौथ्या स्थानावर आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता अक्षय कुमारने फॉर्ब्सस मॅगीजीनच्या वर्ल्ड्स हाईएस्ट-पेड एक्टर्स ऑफ २०१९च्या यादीमध्ये चौथ्या स्थानावर आहे. फोर्ब्स डॉट कॉमच्या नुसार अक्षय कुमारने वर्षभरात ६.५ करोड डॉलर ची कमाई केली आहे.

तसेच फोर्ब्सच्या नुसार सर्वाधिक मेहनत घेणार देशभरात 10 कलाकारांच्या यादीमध्ये हॉलीवुड स्टार ड्वेन ‘रॉक’ जॉनसन हा प्रथम क्रमांकावर आहे. याने १ जून २०१८ पासून ते १ जून २०१९ पर्यंत ८.९४ करोड डॉलर ची कमाई केली आहे.

याचप्रमाणे मार्वल सुपरहीरो यूनिवर्समधील ऑस्ट्रेलिया अभिनेता क्रिस हेम्सवर्थ याने ७.६४ करोड डॉलर कमाई करत दुसऱ्या स्थानावर आहे.

‘आयरनमैन’ रॉबर्ट डाउनी जुनियर तिसऱ्या स्थानावर आहे. तसेच ‘रॉकेट’ स्टार ब्रैडली कूपर सहाव्या स्थानावर आहे. ‘कैप्टन अमेरिका’चे क्रिस इवांस हे आठव्या स्थानावर आहे. ‘एंटमैन’चा पॉल रूड नवव्या स्थानावर आहे. विल स्मिथ ३.५ करोड डॉलर कमाई करत दहाव्या स्थानावर आहे.

१ . ड्वेन जॉनसन ( 8.94 करोड़ डॉलर)

२. क्रिस हेम्सवर्थ (7.64 करोड़ डॉलर)

३. रॉबर्ट डाउनी जूनियर (6.6 करोड़ डॉलर)

४. अक्षय कुमार (6.5 करोड़ डॉलर)

५. जैकी चैन (5.8 करोड़ डॉलर)

६. ब्रैडली कूपर ( 5.7 करोड़ डॉलर)

७. एडम सैंडलर (5.7 करोड़ डॉलर)

८. क्रिस इवांस (4.35 करोड़ डॉलर)

९. पॉल रुड (4.1 करोड़ डॉलर)

१०. विल स्मिथ (3.5 करोड़ डॉलर)