उद्या सकाळी होणार श्रीदेवींच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

shridevi pulli

टीम महाराष्ट्र देशा : संयुक्त अरब अमिरातीतील दुबईपासून 45 मिनिटांवर असलेल्या रास अल खैमामध्ये श्रीदेवी सहकुटुंब गेल्या होत्या. पती बोनी कपूर यांचा भाचा मोहित मारवाहच्या लग्न समारंभासाठी कपूर कुटुंब तिथे गेलं होतं.श्रीदेवी अबुधाबीतील एमिरेट्स पॅलेसला जात असताना त्यांना त्रास जाणवायला लागला. मात्र हॉस्पिटमध्ये दाखल करण्यापूर्वीच त्यांचं निधन झालं होतं.

श्रीदेवी यांचं पार्थिव दुबईतील पोलिस हेडक्वॉर्टरजवळ असलेल्या शवागरात ठेवण्यात आलं आहे. सोनापूरमध्ये त्यांच्या पार्थिवाचं पोस्टमार्टम करण्यात येईल. श्रीदेवींच्या पार्थिवाला लेपन करण्यात येईल.

मुंबईहून एक चार्टर्ड प्लेन दुबईला जाईल. दुबईहून रात्री आठ वाजता हे विमान पुन्हा मुंबईसाठी निघेल. मुंबईत रात्री ११ वाजण्याच्या सुमारास श्रीदेवी यांचं पार्थिव दाखल होण्याची शक्यता आहे.

मुंबईत अंधेरीतील बंगल्यात अंतिम दर्शनासाठी त्यांचं पार्थिव ठेवण्यात येईल. उद्या (सोमवारी) सकाळी श्रीदेवी यांच्या पार्थिवावर सांताक्रुझमध्ये अंत्यसंस्कार होतील.