बॉलिवूडमधील ‘या’ ज्येष्ठ अभिनेत्रीने केले मोदींचे तोंडभरून कौतुक

नवी दिल्ली : जगभरात कोरोना हातपाय पसरत आहे. करोनाचा फैलाव वेगाने होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील स्थिती ज्या पद्धतीने हाताळत आहेत त्याबद्दल अनेकजण मोदींच्या कामाचे कौतुक करत आहे.

बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री सिमी गरेवाल यांनी त्यांचं कौतुक केलं आहे. ‘भारतात ज्या प्रमाण करोनाची स्थिती हाताळली जात आहे. त्या गोष्टीचा मला आज अभिमान वाटत आहे. याचं पहिलं श्रेय हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच जात आहे. त्यांनी देशाच्या भल्यासाठी वेळोवेळी योग्य ते लॉकडाऊनसारखे निर्णय घेतले. त्यामुळं आज करोनाचा संसर्ग कमी आहे’, असं सिमी यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

जगभरात कोरोनाचा हाहाकार सुरुच असून आज कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 16 लाख 4 हजारापेक्षा जास्त आहे. तर कोरोनामुळे बळींची संख्या 95 हजार 506 वर पोहोचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे तीन लाख 57 हजार रुग्ण बरे झाले आहेत,जवळपास 11लाख 51 हजार लोक कोरोनाबाधित आहेत. त्यातील चार टक्के म्हणजे 49 हजार 151 रुग्ण गंभीर आहेत.

भारतात कोरोनाबाधितांचा आकडा 5865 वर पोहोचला आहे तर कोरोनोमुळे देशात 169 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 477 लोक कोरोनामुक्त देखील झाले आहेत. भारतात महाराष्ट्रात सर्वाधिक 1135 कोरोनाबाधित आहेत.