11 जणींच्या प्रेमात पडून देखील सलमान आहे अनमॅरिड

The Story Of Salman Khan and His 11 Girlfriends

टीम महाराष्ट्र देशा: अभिनेता सलमान खानचा आज  वाढदिवस असून त्याने वयाची 52 वर्षे पूर्ण केली आहे. सलमानचे चाहते अजुनही त्याच्या लग्नाची आतुरतेने वाट बघत आहे. आता वयाच्या या टप्प्यावर आल्यानंतर सलमान खरंच लग्न करणार की नाही, हे तर त्याच्याशिवाय दुसरे कुणीच सांगू शकणार नाही. सध्या युलिया वंतूरसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा आहे. आता हे नाते लग्नाच्या मंडपापर्यंत पोहचणार, की त्याच्या मागील रिलेशनशिपप्रमाणे याचादेखील दी एंड होणार हे येणार काळच ठरवले.

एका तरुणीसोबतचे त्याचे नाते लग्नापर्यंत पोहोचले होते. असे म्हटले जाते, की त्यांच्या लग्नपत्रिकादेखील छापल्या गेल्या होत्या. पण दोघे लग्नाच्या मंडपापर्यंत पोहचण्याआधीच वेगळे झाले.

Loading...

संगीता बिजलानी- बॉलिवूडमध्ये सलमानने पदार्पण केल्यानंतर त्याच्या आयुष्यात सर्वप्रथम अभिनेत्री संगीता बिजलानी हिची एन्ट्री झाली होती. बरेच वर्षे दोघे रिलेशनशिपमध्ये होते. मात्र काही कारणास्तव हे दोघेही विभक्त झाले. सलमानपासून दूर होऊन तिने क्रिकेटर अजहरुद्दीनसोबत लग्न केले. एवढ्या वर्षांनंतरसुद्धा सलमानचे संगीतासोबतचे मैत्रीचे नाते कायम आहे.sangeeta-bijlani

सोमी अली – अभिनेत्री सोमी अलीसोबत सलमान खान बरेच दिवस रिलेशनशिपमध्ये होता. या दोघांच्या प्रेमप्रकरणाची दीर्घ काळ चर्चा रंगली. दोघांचे लग्नही ठरले होते. इतकेच नाही तर त्यांच्या लग्नपत्रिकाही छापून आल्या होत्या, असे म्हटले जाते. मात्र त्यांच्या प्रेमाचे रुपांतर लग्नात होऊ शकले नाही. somy-ali_

ऐश्वर्या राय बच्चन– सलमानचे सर्वात गाजलेले प्रेम प्रकरण हे अभिनेत्री ऐश्वर्या रायसोबतचे होते. हम दिल दे चुके सनम या सिनेमाच्या सेटवर ऐश्वर्या आणि सलमानचे सूत जुळले होते. मात्र सलमानच्या रागीट स्वभावाने ऐश्वर्या त्याच्यापासून दुरावली. सिनेमाच्या सेटवर जाऊन त्याने तिला मारहाण, शिवीगाळसुद्धा केली होती. सलमानपासून विभक्त होऊन ऐश्वर्याने अभिनेता अभिषेक बच्चनसोबत लग्न केले. 

स्नेहा उलाल – ऐश्वर्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर हुबेहुब तिच्यासारखीच दिसणारी तरुणी सलमानच्या आयुष्यात आली. त्या तरुणीचे नाव होते स्नेहा उलाल. सलमानने स्नेहाला बॉलिवूडमध्ये संधी दिली. मात्र स्नेहासोबतसुद्धा सलमानने नाते टिकवले नाही.Sneha-Ullal-in-hatकतरिना कैफ- सलमानच्या आयुष्यात अभिनेत्री कतरिना कैफची एन्ट्री झाली होती. हे दोघे लग्न करतील, असेही म्हटले जात होते. मात्र कतरिनाने सलमानसोबत ब्रेकअप करुन अभिनेता रणबीर कपूरचा हात पकडला होता. ‘एक था टायगर’ या सिनेमाच्या सेटवर सलमानने कतरिना मारहाण केल्याची बातमी आली होती. आता तब्बल पाच वर्षांनी कतरिनाने सलमानसोबत टायगर जिंदा है या चित्रपटात काम केले.

salman-katrinaजरीन खान – कतरिना कैफसोबत ब्रेकअप झाल्यानंतर जरीन खानची एन्ट्री सलमानच्या आयुष्यात झाली होती. जरीनला सलमानने अनेक मोठे सिनेमे मिळवून दिले होते. मात्र लवकरच त्यांचे ब्रेकअप झाले. 

डेजी शाह- सलमानच्या जय हो या सिनेमात डेजी शाह या नवीन अभिनेत्रीला बघून प्रत्येक जण दंग झाला. डेजी आणि सलमानच्या लिंकअपच्या बातम्यासुद्धा आल्या होत्या.

salman-daisy

क्लाउडिया – सलमान खान जर्मन मॉडेल क्लाउडियाच्याही प्रेमात पडला होता.  German model Claudia

एली अवराम-  बिग बॉसच्या शूटिंगदरम्यान सलमानचे नाव एली अवरामसोबतसुद्धा जुळले होते.

Elli-Salmanजॅकलिन फर्नांडिस – सलमान श्रीलंकन ब्युटी जॅकलिनच्या प्रेमात पडल्याचीही चर्चा होती. इतकेच नाही तर सलमानने जॅकलिनला मुंबईत घर घेऊन दिल्याचेही म्हटले गेले होते. पण नंतर जॅकलिनने या सर्व अफवा असल्याचे म्हटले होते. jacqueline fernandez

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

इतिहासावरून देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरेंमध्ये जुंपली
'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
सुप्रिया सुळे यांनीही पहिला 'तान्हाजी', चित्रपट पाहून म्हणाल्या...
पाच वर्ष सरकार चालवायचं आहे लक्षात ठेवा;शरद पवारांचा संजय राऊतांना सूचक इशारा
मलाही बेळगाव पोलिसांनी मारहण केली होती : शरद पवार
सचिन सावंत संभाजी भिडेंवर बरसले, म्हणतात...
'माझे पप्पा' हा निबंध लिहून सर्वांच्या डोळ्याला पाणी आणणाऱ्या 'त्या' मुलाची धनंजय मुंडेंनी घेतली दखल
राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेला 'हा' युवा आमदार बनला ठाणे शहर जिल्हा भाजप अध्यक्ष
‘सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी विरोधी पक्षातील भूमिकेतून बाहेर यावं’
मोठी बातमी : महाविकास आघाडीचं बिनसलं, कॉंग्रेस-राष्ट्रवादी आमने सामने