कोल्हापूरातील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी धावला ‘भाईजान’

मुंबई : गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीचा कोल्हापूर जिल्ह्याला मोठा फटका बसला होता. इथली अनेक गावंच्या गावं पाण्याखाली गेली होती. या पुरामुळे बाधीत झालेल्यांच्या मदतीसाठी आता प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सलमान खान धाऊन आला आहे.

सलमान खानची चित्रपट निर्मिती संस्था ‘सलमान खान फिल्म्स’ आणि गुरुग्राम येथील ‘ऐलान फाऊंडेशन’ या दोन संस्थांनी मिळून खिद्रापूर गाव दत्तक घेतल्याची माहिती आहे. पूरग्रस्तांचे संसार सावरण्यासाठी सलमान पक्की घरं बांधून देणार आहे.

Loading...

याचप्रमाणे ‘गेल्या वर्षी महाराष्ट्रातील पुरामध्ये ज्यांनी आपलं कुटुंब गमावलं त्यांच्यासोबत माझ्या संवेदना आहेत. या पुरामध्ये अनेकांनी आपली घरं गमावली आहेत. त्यामुळे ही घरं पुन्हा उभारून देत त्यांना उभं करण्याचा आमचा प्रयत्न आहे,असं सलमान खानने याबाबत बोलताना म्हटलं आहे.

दरम्यान, ‘भारताच्या ग्रामीण भागात सकारात्मक बदल घडवून आणण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या विकासासाठी आमचा लहानसा प्रयत्न आहे. सहकार्याबद्दल सलमान खानचे आभार’ अशी प्रतिक्रिया ‘एलान फाऊंडेशन’च्या संचालकांनी दिली आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
सावधान ! कोरोनाचे नवे केंद्र झोपडपट्टीत, अनेकजण सापडले कोरोनाबाधित
...त्यामुळे भारताला कोरोनापासून अमेरिके इतका धोका नाही, या तज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले मत
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
'नवे रुग्ण न आढळल्यास 'हे' राज्य '७ एप्रिल'पर्यंत कोरोनामुक्त होण्याची शक्यता'
महाराष्ट्रातील ‘या’ शहरात वाढला कोरोनाग्रस्तांचा झपाट्याने आकडा, सात महिन्यांच्या बाळाचाही समावेश
रुग्णालयाची अवस्था पाहून तुकाराम मुंढेंचा संताप; जमत नसेल तर घरी जा...
आज सांयकाळी आणि उद्या सकाळी दुध मिळणार नाही कारण.....
'धन्यवाद अजित पवार! शेवटी अनुभवाचं महत्व तुम्ही दाखवून दिलं; बाकीचे फेसबुक लाईव्हमध्ये व्यस्त'
#मरकज : मशीद खाली करण्यास मौलानांनी दिला नकार,  अजित डोवालांना उतरावं लागल मैदानात