बॉलीवूड अभिनेता फरदीन पुन्हा पडद्यावर झळकणार

frdeen

मुंबई : अभिनेता रितेश देशमुख आणि फरदीन खान चित्रपट निर्माता संजय गुप्ता निर्मित ‘विस्फोट’ मध्ये लवकरच दिसणार आहे. फरदीनच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी ठरतेय.

बऱ्याच चित्रपटात फरदीनची छाप पहायला मिळाले. मात्र एका दशकानंतर आगामी चित्रपट ‘विस्फोट’ च्या माध्यमाने अभिनेता फरदीन खान पुन्हा चित्रपटसृष्टीत झळकणार आहे. दिवंगत फिरोज खान चे सुपुत्र फरदीन यांनी अनेक चित्रपट गाजवले आहेत. परंतू २०१० मधील ‘दुल्हा मिल गया’ मध्ये त्याने शेवटचा अभिनय केला होता.

आता तब्बल एका दशकानंतर पुन्हा चाहत्यांना तो दिसणार असल्याने त्याच्याबद्दल आता चांगलीच चर्चा रंगत आहेत. तसेच फरदीन आणि रितेश हे दोघे १४ वर्षापूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘हे बेबी’ मध्ये एकत्र दिसले. त्यानंतर ही जोडी पुन्हा दिसणार आहे. रॉक,पेपर,कैची चा रीमेक ‘विस्फोट’ हा विदेशी भाषा ऑस्कर साठी ८५व्या अकादमी पुस्कारात निवडला गेला. आगामी काळात फरदीनच्या या चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.

महत्त्वाच्या बातम्या