जाणून घ्या अशा सिनेकलाकारांबद्द्ल ज्यांनी राजकारणात आपलं नशीब आजमावलं

प्रतिनिधी, कल्याणी नागोरे – राजकारण असो की,फिल्म इंडस्ट्री अभिनय हा आलाच! मग फिल्मी जगतातील ताऱ्यांपेक्षा चांगला अभिनय कोणला जमणार?  भारतीय राजकारणात आता पर्यंत अनेक सेलिब्रिटींनी प्रवेश केला. काहींचे करिअर चमकले तर, काहींना राजकारणाच्या दलदलीला कायमचा राम – राम ठोकला. अशाच काही सिनेकलाकारांनी राजकारणात आपले नशीब आजमावले. अशा कलाकारांबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊया.
अमिताभ बच्चन – महानायक अभिताभ बच्चन यांनी सुद्धा या दलदलीचा मोह आवरला नाही. बच्चन राजीव गांधीचे चांगले मित्र होते. त्यांच्याचं म्हणण्यावर त्यांनी ८वी लोकसभा निवडणूक एच. एन. बहुगुणा विरुद्ध लढली व ६८.२% मतांनी जिंकली सुद्धा, पण त्यांचा राजकारणाशी मेळ काही जमला नाही. त्यामुळे त्यांचे राजकीय करिअर जास्तकाळ टिकले नाही. त्यांना ३ वर्षात पदाचा राजीनामा द्यावा लागला. पुढे अमिताभ यांचे मित्र अमर सिंग ( ज्यांनी अमिताभ यांना ABCL कंपनीला डबघाई पासून वाचवले होते. ) यांचा समाजवादी पार्टीचा उघड प्रचार केला. पुढे समाजवादी पार्टी तर्फे राज्यसभेमध्ये जया बच्चन खासदार बनल्या.
गोविंदा – २००४ साली गोविंदाने कॉंग्रेस पार्टीत प्रवेश केला. प्रवास, स्वास्थ, व शिक्षण या तीन मुद्यांवर तो मुंबई निवडणुकांना उभा राहिला. ५० हजार मतांनी त्याने ही निवडणूक जिंकली. निवडणूकी पूर्वी दिलेली आश्वासन पूर्ण करण्यासाठी त्याने मन लावून काम केले. तसेच स्वखर्चावर त्याने अनेक सामजिक कार्य केले. वसई – विरार पाणी प्रश्न सोडवण्यास ही मदत केली. मात्र पुढे अभिनय क्षेत्र आणि राजकारणाचा मेळ न बसल्याने २० जानेवारी २००८, गोविंदाने राजकारणाला राम-राम ठोकला.
हेमा मालिनी – हेमा मालिनी आणि राजकारणाचे नाते फार जुने आहे. १९९९ मध्ये विनोद खन्ना भाजपचे उमेदवार होते. यावेळी हेमाने विनोद खन्ना साठी प्रचार केला होता . यानंतर २००३ पासून २००९ पर्यंत हेमाने राज्यसभेच्या सदस्य राहिल्या व २००४ भाजपा अधिकृतरित्या सहभागी झाल्या. २०१४ ला हेमा मालिनी जयंत चौधरी विरुद्ध उभ्या होत्या.
i-can-become-chief-minister-in-a-minute-says-hema-malini
स्मृती इराणी – भाजपच्या अजून एक कार्यकर्त्या म्हणजे स्मृती इराणी. २००३ त्यांनी भाजपात प्रवेश केला. यानंतर महाराष्ट्र युथ विंग , सेन्ट्रल कमिटी अशा विविध पदावरून त्या निवडून आल्या होत्या. डिसेंबर २००४,गुजरातमध्ये भाजपाचा दणदणीत पराभव झाला. यावेळी नरेंद्र मोदीमुळेच निवडणूक हरल्याचा आरोप स्मृती इराणीने केला होता. २०१६ मध्ये भाजपा सत्तेत आल्यानंतर स्मृती इराणीला वस्त्र उद्योग मंत्री बनवण्यात आले. तसेच २०१७, मध्ये माहिती आणि कारभार ही त्यांना सोपवण्यात आला.
राखी सावंत – फिल्म इंडस्ट्री मधील सगळ्यात ‘Controversial Queen’ म्हणजेच राखी सावंत. आपल्या बोल्ड व मादक अदा तसेच भडकावू मतांमुळे नेहमीच ती चर्चेत राहते. ( किंवा राहण्याचा प्रयत्न करते ) २६ मार्च २०१४ मध्ये मुंबईतून अपक्ष लोकसभा निवडणुकीसाठी ती उभी राहिली. तसेच राष्ट्रीय आम पार्टी म्हणून स्वपक्ष ही निर्माण केला.हिरवी मिरची असे तडक-भडक बोधचिन्ह ठेवले.  ज्याला ओशिवरा ह्या स्थानिक व्यापाऱ्याने अर्थ साह्यय्य पुरवले. पण राखीचा झटका काही चालला नाही. स्वतःचे एक व इतर १४ अशी एकूण १५ मते मिळून राखी सावंत तोंडावर पडली. शेवटी डीपोझीट जप्त झाल्यावरच ती शांत बसली.
सनी देओल, उर्मिला मार्तोंडकर, जया प्रदा ही या वेळी राजकारणात आपले नशीब आजमावत आहे. आता उत्सुकता असेल हे नेते (अभिनेते) मंडळी राजकारणात काय गुल खिलवतात हे बघण्याची !