fbpx

एशियन बॉडी बिल्डिंग आणि फिटनेस स्पर्धेत भारताला ब्रॉंज पदक

नेवासा / भागवत दाभाडे: नेवासा तालुक्यातील भेंडा येथील सर्वसामान्य कुटुंबातील सर्जेराव विलास खरात याने बॉडी बिल्डिंग व फिटनेस चॅम्पियन स्पर्धेत 75 किलो वजनी गटात भारताला ब्रॉंज पदक मिळवून दिले आहे. खरातच्या या कामगिरीमुळे महाराष्ट्राची मान उंचावली आहे. व हि एक अभिमानास्पद बाब आहे.घरची परिस्थिती सर्वसामान्य असल्याने जिद्दी ,चिकाटी व सराव या जोरावर खरात ने हि कामगिरी केली आहे. व त्यांची खिलाडू वृत्ती सर्वांना ज्ञात आहे.

खरातच्या या दैदिप्यमान कामगिरी मुळे नेवासा परिसरात त्याचे सत्कार करण्यात येत आहे. तालुक्याचे आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी ही खरात याचा सत्कार करून अभिनंदन केले व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी वसंत फर्निचरचे प्रोप्राईटर श्री वसंत गरड , भारत गरड , अमोल कोलते , किशोर कुसारे , संदीप जाधव आदी उपस्थित होते.