‘गंगेतून उत्तर प्रदेशातील मृतदेह पश्चिम बंगालमध्ये ; धोका वाढला’

yogi

कोलकत्ता : देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर माजवला होता. देशात दररोज विक्रमी कोरोनाबाधितांची नोंद होत होती यामुळे आरोग्य सेवेवर प्रचंड तणाव निर्माण झाला होता. राज्यात देखील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे इतर राज्यांपेक्षा अधिक गंभीर परिणाम दिसून आले असून अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

अशातच, रुग्णालयात बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसीवीर, अपुरी आरोग्य यंत्रणा, डॉक्टरांची कमतरता व इतर औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागला असून व्यवस्थेविरोधात नागरिकांमध्ये चीड निर्माण होत असल्याचे मागील काही दिवसांपूर्वी आपल्याला पाहायला मिळाले होते.

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांवर अंतिम संस्कार करण्यासाठी जागा देखील मिळत नसल्याचे चित्र होते. बिहार, उत्तर प्रदेश मधून धक्कादायक वास्तव समोर आलं होते. गंगेच्या किनारी करोना रुग्णांचे मृतदेह वाहून आल्याचा धक्कादायक प्रकार देखील काही दिवसांपूर्वी समोर आला होता. याच मुद्द्यावरून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी योगी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

उत्तर प्रदेशमधून येणाऱ्या नद्यांमधून मृतदेह पश्चिम बंगालमध्ये येत असल्याचं म्हटलं आहे. तसेच कोरोना रुग्णांचे मृतदेह असल्याने कोरोना संक्रमणाचा धोका अधिक असल्याचं म्हटलं आहे. मृतदेहांमुळे नदीतील पाणी देखील प्रदूषित झालं असल्याचे त्यांचे मत आहे. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या कि, ‘उत्तर प्रदेशमधून अनेक मृतदेह गंगा नदीच्या माध्यमातून पश्चिम बंगालमध्ये येत आहेत. यामुळे नदीचं पाणी प्रदूषित झालं आहे. मालदा जिल्ह्यामध्ये नदीत सडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आले आहेत. यापैकी काहींवर राज्य सरकारने अंत्यस्कार केले आहेत’ असे त्यांनी सांगितले आहे.

महत्त्वाच्या बातम्या