मुंबई : असे म्हणतात की, बॉलीवूडमध्ये प्रसिद्धी मिळवणे खूप सोपे आहे, पण जास्त काळ टिकवणे खूप अवघड आहे. असे खूप कलाकर आहेत ज्यांनी खूप कमी कालावधीमध्ये प्रसिद्धी मिळवली पण काही कारणांमुळे त्याचं करिअर संपल. बॉलीवूडमधील असाच एक अभिनेता आहे बॉबी देओल. अभिनेता बॉबी देओलने ‘सोल्जर’ आणि ‘अजनबी’ या दोन सुपरहिट चित्रपटांमधून चांगले नाव कमावले होते.
माहितीनुसार, २००७ मध्ये ‘जब वी मेट’ या चित्रपटासाठी पहिली पसंती शाहीदला नाही तर बॉबीला दिली होती. करीनामुळे हा चित्रपट शाहीदला मिळाला. यावेळी बॉबी देओलचे करिअर उद्ध्वस्त झाले. अशी माहिती बॉबीने एका मुलाखतीमध्ये दिली होती. बॉबी देओल त्याच्या बुडत्या करिअरचे श्रेय त्याच्या सहकलाकारांना देखील देतो.
बॉबी देओलने सांगितले कि, ‘जब वी मेट’ या चित्रपटासाठी त्याची पहिल्यांदा निवड झाली होती. पण नंतर सहा महिन्यानंतर बॉबी ला समजले कि, अभिनेत्री करीना कपूरच्या सांगण्यावरून इम्तियाज अलीने शाहीदला आपली भूमिका दिली होती. बॉबी अजून देखील म्हणतो जर या चित्रपटात काम मिळाले असते तर माझी कारकीर्द अजूनही वेगळी असती. बॉबीच्या बुडत्या कारकिर्दीला पाठिंबा देण्यासाठी सलमान खानने त्याला ‘रेस ३’ या चित्रपटात भूमिकेची ऑफर दिली. आता बॉबीला परत एकदा लोकप्रियता मिळू लागली आहे.
महत्वाच्या बातम्या :-