धक्कादायक : शिवस्मारकाच्या पायाभरणीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली

मुंबई : अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या पायाभरणी कार्यक्रमासाठी गेलेल्या बोटीला अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या बोटीमध्ये तब्बल 25 लोक असल्याचे समजते.गिरगावच्या समुद्रात ही  स्पीड बोट बुडाली आहे.

खडकावर आदळून बोटीला अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. बोटीतील लोकांना वाचवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. 2 हेलिकॉप्टर, 2 बोटींच्या सहाय्याने मदत सुरू आहे. बोटीतील सर्व जण सुखरूप असून सर्वांना वाचवण्यात यश आल्याची माहिती महाराष्ट्र सरकारच्या जनसंपर्क कार्यालयाने दिली आहे.

You might also like
Comments
Loading...