लग्नाचे आमिष दाखवत अत्याचार; मुंबई महापालिकेतील अभियंता ताब्यात

ठाणे : मुंबई महापालिकेत अभियंता पदावर काम करणा-या दत्ताराम शिंदे विरोधात पोलिसांनी फसवणूक आणि अत्याचार करत धमकावल्याचा गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे. दत्तारामला न्यायालयात हजर केले असता त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दत्तारामने तक्रारदार महिलेशी जवळीक साधत तिला लग्नाचे अमिष दाखवले. दरम्यान गुंगीचे औषध पाजून तिच्यावर अत्याचार आणि अनैसर्गिक अत्याचार केले. तसेच तिची छायाचित्र काढून बदनामी करण्याची धमकी देत वारंवार अत्याचार केल्याची तक्रार कासारवडवली पोलीस ठाण्यात फिर्यादी महिलेने केली. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.

You might also like
Comments
Loading...