fbpx

‘ते’ ट्विट भोवलं ; मुख्यमंत्र्यांकडून आयएएस निधी चौधरींची बदली

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रपिता महात्मा गांधीविषयी वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या आयएएस अधिकारी निधी चौधरी यांच्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारवाई केली आहे. फडणवीस यांनी निधी चौधरी यांच्या पोस्टची गंभीर दाखल घेत मंत्रालयातील पाणी पुरवठा विभागात बदली केली आहे.

आयएएस अधिकारी निधी चौधरी यांनी, १५० व्या जयंती वर्षाचा अत्यंत जल्लोष सुरु आहे. आता वेळ आली आहे त्यांचा चेहरा चलनी नोटांवरुन हटवण्याची, जगभरातून त्यांचे पुतळे हटवण्याची, त्यांच्या पश्चात रस्ते आणि संस्थांना दिलेली नावं बदलण्याची, तीच आपल्या सर्वांकडून खरी आदरांजली ठरेल. धन्यवाद गोडसे. ३०.०१.१९४८ अशा आशयाचं ट्विट करत गांधीजींचा फोटो शेअर केला होता.

निधी चौधरी यांच्यावर सर्व स्तरावरून टीकांचा भडीमार सुरु होता, इतकेच नव्हे तर, त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, चौधरी यांना निलंबित करण्यात यावं अशा मागण्याही करण्यात येत होत्या.

याचदरम्यान, निधी चौधरी यांच्या ट्विटची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौधरी यांची मुंबई महापालिकेतून मंत्रालयातील पाणी पुरवठा विभागात बदली करण्यात आली आहे. तसेच, राज्य सरकारकडून निधी चौधरी यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. असे वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी म्हंटले आहे.