मुंबई: राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना मोठा झटका बसला आहे. ईडीच्या कारवाई विरोधात करण्यात आलेली याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळली आहे. नवाब मलिक यांना ईडीने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केली आहे. आपली अटक बेकायदेशीर असल्याचं सांगत त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात ईडीच्या कारवाई विरोधात याचिका दाखल केली होती. यावर सुनावणी झाली असून मुंबई उच्च न्यायालयाने नवाब मलिकांची याचिका फेटाळली (Mumbai High Court rejects petition against ED) आहे.
दरम्यान मनी लाँड्रिंग प्रकरणी नवाब मलिक यांना २३ फेब्रुवारी रोजी ईडीने अटक केली. यानंतर मलिक यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत ईडीने दाखल केलेले गुन्हे रद्द करण्याची मागणी नवाब मलिक यांनी याचिकेतून केली होती. लिक यांच्या विरोधात जो गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यात काही तथ्य नाही मात्र त्यांचा संबंध अंडरवर्ल्ड सोबत जोडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे त्यांच्या वकिलांनी म्हटले होते.
दरम्यान नवाब मलिक यांनी हसीना पारकरला ५५ लाख नाही तर 5 लाख रुपये दिले होते. ५५ लाख रुपये दिले ती एक टायपिंग चूक असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी ईडीच्या वकीलांनी न्यायालयात दिली होती. दरम्यान आजच्या सुनावणीमुळे नवाब मलिक यांच्या अडचणीत आणखी वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
महत्वाच्या बातम्या:
- हिजाब हा धर्माचा अविभाज्य भाग नाही- कर्नाटक उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
- ‘ईडीच्या अधिकाऱ्यांची खोटी नावं सांगून दिशाभूल करण्याचा प्रयत्न’ – मोहित कंबोज
- “शिक्षणाच्या मंदिराला धर्माचा आखाडा बनवू नये”, हिजाब प्रकरणी चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया
- प्रविण दरेकरांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल; नितेश राणे म्हणाले,“अपेक्षेप्रमाणे…”
- IPL 2022: एमसीसीने जारी केलेले नवीन नियम आयपीएलमध्ये लागू करण्याबाबत बीसीसीआयचा मोठा निर्णय!
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<