उमरखेडमध्ये जातीय सलोखा कायम राखण्यासाठी एकता दूर्गोत्सव मंडळाचा पूढाकार

In Umarkhed

संदेश कान्हु (जिल्हा प्रतिनिधी) यवतमाळ; जिल्ह्यातील उमरखेड़ येथे महात्मा गांधी चौकामध्ये एकता दूर्गोत्सव मंडळातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते . मंडळाकडून राबविण्यात आलेल्या या उपक्रमामध्ये सर्वधर्मियांनी रक्तदान करण्यासाठी सहभाग नोंदविल्याने शहरात सलोख्याचे वातावरण निर्माण झाले आहे .

मागील वर्षी गणेश उत्सवा दरम्यान एका घटनेने गणेशोत्सवाला गालबोट लागले होते . त्यानंतर सामाजिक संघटनांनी गेल्या एक वर्षात जातीय सलोखा कायम ठेवण्यासाठी पूढाकार घेतला . एकता दूर्गोत्सव मंडळाच्या पूढाकाराने बकरी ईद च्या पर्वावर , गणेश उत्सव आणि आगामी दूर्गा उत्सव काळात जातीय सलोखा कायमराहावे यासाठी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते .

वसंतराव नाईक शासकिय वैद्यकिय महाविद्यालय यवतमाळ व अपर्ण ब्लड बँक यांच्या माध्यमातून भव्य रक्तदान शिबीर घेण्यात आले . मंडळाचे कार्याध्यक्ष लक्ष्मीकांत नंदनवार , अध्यक्ष व्यंकटेश पेंशनवार यांनी या शिबिरासाठी विशेष पुढाकार घेतला होता . या शिबीरास उपविभागीय अधिकारी संजय पूजलवार , ठाणेदार हमूमंत गायकवाड , न. पा . उपाध्यक्ष अरविंद भोयर , नगरसेवक नितीन भूतडा , मूजी बूर रहेमान , अलीम साब मौलाना , प्रकाश दूधेवार, गजानन ठाकरे यांच्या सह अनेक जनांनी उपस्थिती दर्शवून मंडळाच्या उपक्रमाचे कौतूक केले .