fbpx

समलिंगी, तृतीयपंथीयांना रक्तदान करण्यास बंदी

वेबटीम : राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेने समलैंगिक, तृतीयपंथीय, आणि लिंग परिवर्तन केलेल्या व्यक्तींना रक्तदान करण्यास कायमची बंदी घातली आहे. या व्यक्तींचे रक्तदान इतरांसाठी धोक्याचे ठरण्याची सर्वाधिक शक्यता असल्यामुळे बंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. माहितीच्या अधिकारात ही माहिती समोर आली आहे.
 समलैंगिक, तृतीयपंथीय, आणि लिंग परिवर्तन केलेल्या व्यक्ती उच्च जोखीम गटात मोडतात त्यामुळे त्यांना रक्तदान करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
एलजीबीटी गटातील व्यक्तींचे एकापेक्षा अनेक व्यक्तींबरोबर लैंगिक संबंध असतात. यामुळे त्यांना एड्स होण्याची शक्यता अधिक असते. त्यांच्या रक्तातून सशक्त व्यक्तीला एड्सची लागण होण्याचा धोका असतो. यामुळे त्यांना उच्च जोखीम गटात ठेवण्यात येते. असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.माहिती अधिकार कार्यकर्ते चेतन कोठारी यांनी माहितीच्या अधिकारात रक्तदान बंदीबाबतची माहिती मागवली होती, त्यावेळी त्यांना ही माहिती मिळाली.