fbpx

अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे अंध विद्यार्थ्यावर उपासमारीची वेळ

पुणे: पुण्यातील सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाच्या शासकीय वसतिगृहात 2 दिवसापासून मेस बंद असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या विरोधात अंध विद्यार्थी तसेच छात्रभारतीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केलं. मेस बंद असल्याने जवळपास 500 मुलांवर 2 दिवासापासून उपाशी राहण्याची वेळ आली आहे .

शासकीय वसतिगृहात कुठल्याच सुविधा नाहीत. त्यासाठी तक्रार करावी तर कोणताच अधिकारी मुलांचा फोन देखील उचलत नाही . त्यामुळे विद्यार्थी हतबल झाले आहेत. हातावर पोट असणाऱ्या या विद्यार्थ्यांची उपासमारीने तब्बेत खालावत आहे. अन्नात किडे निघत असल्याच्या तक्रारी विद्यार्थी करत आहेत . या अशा अवस्थेत आता समाजकल्याण राज्यमंत्र्यांच्या घरातच अंधार असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मंत्री महोदय या अंध मुलांच्या प्रश्नाकडे डोळस पणे कधी पाहणार हे औत्सुक्याचे असणार आहे .