अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने अंध विद्यार्थांच्या समस्यांना फोडली वाचा

टीम महाराष्ट्र देशा : आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने अंध विद्यार्थ्यांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या कार्यालया समोर आंदोलन केले.

यावेळी अंधांच्या अनेक समस्या विद्यापीठाच्या समोर मांडल्या. त्यामध्ये अभविप ने लेखनिक म्हणून जाणाऱ्या विद्यार्थ्यास न मिळणारे हक्काचे मानधन त्यांना देण्यात यावे अशी मागणी केली. त्याचबरोबर अंध मुलांना देण्यात येणारे प्रकल्प, असाइनमेंट्स रद्द करण्यात येऊन त्या जागी त्यांचा ब्रेल स्वरूपात पेपर अथवा तोंडी परीक्षा घेण्यात यावी असा उपाय देखील सुचवला . तसेच सर्व महाविद्यालयांमध्ये ऑडिओ नोटीस बोर्ड लावण्यात यावे. महाविद्यालयांवर गेट इंडिकेटर्स बसवण्यात यावे अशा विद्यार्थीहितार्थ मागण्या करण्यात आल्या.

Loading...

विद्यार्थ्यांच्या समस्यांवर विद्यापीठाची शांतता पाहता अभाविपने प्र कुलगुरू उमराणी सर, तसेच कुलगुरू कार्यालयाच्या सचिव साकोरे मॅडम यांना ‘कोरे निवेदन’ देऊन निषेध नोंदवला. यावेळी या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणावर अंध विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्या मान्य होण्यासाठी आंदोलनामध्ये सहभाग नोंदवला.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

रोड कंत्राटदाराकडून कमिशन मागणाऱ्या महाराष्ट्रातल्या ७ खासदारांची आणि १२ आमदारांची होणार चौकशी
'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
मोठाभाई ‌खूपच व्यस्त;अजिबात वेळ नाही जाणून घ्या काय आहे कारण
रोहित पवार.... नाव तर ऐकलच असेल, पवारंनी लावला थेट मोदींना फोन
जेएनयू प्रकरणातील संशयित हल्लेखोरांची ओळख पटली,सत्य जाणून तुम्हालाही बसेल धक्का
मोठी बातमी : महाविकास आघाडीचं बिनसलं, कॉंग्रेस-राष्ट्रवादी आमने सामने
सांगली बंदमागे राजकीय षडयंत्र आहे म्हणणाऱ्या सुळेंवर निलेश राणेंनी डागली तोफ
आमच्या दैवताबद्दल जो अपशब्द काढेल त्याची जीभ जागेवर राहणार नाही
भिडेंच्या सांगली 'बंद'ला राऊतांचे प्रत्युत्तर, म्हणाले...
सचिन सावंत संभाजी भिडेंवर बरसले, म्हणतात...