थंडी वाजू नये म्हणून आंबेडकरांच्या पुतळ्याला घातले ब्लँकेट

टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्रासह देशभरात थंडीची लाट आहे. प्रत्येकजण ब्लँकेट पांघरून थंडीपासून बचाव करत आहेत.या थंडीमुळेच उत्तर प्रदेशमधील एका व्यक्तीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला चक्क ब्लँकेट पांघरले आणि त्याच्यासमोर शेकोटी पेटवल्याचा प्रकार मुज्जफरानगर येथील कठैली परिसरात घडला आहे. पुण्यातही थंडीत गणपतीला ब्लँकेट पांघरण्यात येते.त्यानंतर आता चक्क डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला ब्लंकेट पांघरले आहे. पोलिसांनी चौकशी केली असता बाबासाहेबांचा पुतळा थंडीत गोठू नये म्हणून मी त्यांच्या पुतळ्याभोवती ब्लँकेट पांघरल्याचे त्या व्यक्तीने सांगितले आहे.

‘मला थंडी वाजत होती. त्यामुळे आंबेडकरांनाही थंडी वाजत असेल असं मला वाटलं. याच कारणामुळे मी त्या पुतळ्यावर ब्लँकेट पांघरले आणि त्याच्यासमोर शेकोटी पेटवली.’ असं या व्यक्तीने म्हंटले आहे. स्थानिकांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार केली.पोलिसांनी या प्रकरणाचा लागलीच तपास करून आंबेडकरांच्या पुतळ्यावर ब्लँकेट पांघरणाऱ्याला अटक केली. मात्र, तो मनोरुग्ण असल्याचे लक्षात आल्यामुळे त्याला सोडून देण्यात आले आहे.आरोपी मनोरुग्ण असल्यामुळे कसल्याही प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचे पोलीसांनी सांगितले आहे.