अहमदनगर : राज्यात सत्तेवर असलेल्या आघाडी सरकार आणि त्यांचे घटक पक्ष असलेले काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आणि शिवसेना यांच्यामध्ये नेहमीच काही ना काही तरी वादाची धग असते. मग यामध्ये मंत्रिमंडळ विस्तारावर असो वा स्थानिक पातळीवर आघाडी धर्म पाळण्यावर असो या पक्षांमध्ये नेहमीच वाद दिसून येतो.
यावेळी अहमदनगर शहरामध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये असाच एक वाद पेटला आहे. त्यामध्ये काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्षांनी राष्ट्रवादीच्या आमदारांना गुंड म्हटले तर प्रत्युत्तर देताना राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसच्या शहराध्यक्षा खंडणीचा आरोप केला आहे तरी आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचे भाचे सत्यजित तांबे यांची फूस असल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून होत आहे.
शहरातील एका व्यापाऱ्याला मारहाण झाल्याच्या प्रकरणावरून या दोन पक्षांच्या पदाधिकाऱ्यांमधील जुना वाद पुन्हा उफाळून आला. यामध्ये काँग्रेसचे शहराध्यक्ष किरण काळे यांनी राष्ट्रवादीचे आमदार जगताप त्यांच्या समर्थकांकडून आपल्याला धमकावल्याचा आरोप करत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तर काळे यांच्या आरोपांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अभिजित खोसे यांनी काळे प्रसिद्धीसाठी जगताप यांच्यावर आरोप करीत आहेत. तसेच काळे हे थोरात व तांबे यांचे समर्थक आहेत. त्यामुळे पराभवाचा वचपा काढण्यासाठी थोरात आणि तांबे यांच्या सांगण्यावरून काळे हे जगताप यांच्यावर आरोप करत असल्याचे प्रत्युत्तर दिले आहे.
त्यामुळे आता हा स्थानिक वाद वाढत गेल्यास राज्यपातळीवरील नेत्यांकडे जाण्याची शक्यता असून वरिष्ठ नेते यावर काय मार्ग काढतात याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. आघाडीत मतभेद कायम असताना दुसरीकडे मात्र अहमदनगरच्या महानगरपालिकेत भाजपची सत्ता मात्र सुरळीत सुरू आहे.
महत्वाच्या बातम्या-
- ‘आइटम’ हा सर्रास वापरला जाणारा शब्द आहे,यामध्ये अपमानजनक काय आहे?
- सहकाऱ्याच्या अस्थी विसर्जनावेळी जयंत पाटील झाले भावूक;अश्रू झाले अनावर…
- गाफील राहू नका, अतिवृष्टीचा धोका अद्याप टळलेला नाही : उद्धव ठाकरे
- माझा पराभव झाला तर कदाचित मला देशही सोडावा लागेल- डोनाल्ड ट्रम्प
- घरातील अन्नधान्य भिजलंय खायचं काय ? शेतकरी महिलेचा संभाजीराजेंना सवाल