fbpx

Trupti Desai- तृप्ती देसाई संघटनेच्या नावाखाली लोकांना ब्लॅकमेल करतात- डॉ. विजय मकासरे

तृप्ती देसाई भूमाता रणरागिणी ब्रिगेड संघटनेच्या नावाखाली लोकांना ब्लॅकमेल करत असल्याचा गंभीर आरोप  डॉ. विजय मकासरे यांनी केला आहे. 27 जून रोजी तृप्ती देसाई त्यांचे पती आणि अन्य काही साथीदारांनी मकासरे यांना जबर मारहाण केली होती. आज माध्यमांसमोर मकासरे यांनी आपली बाजू मांडली यात देसाई यांच्यावर त्यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत.
दरम्यान तृप्ती देसाई आणि त्यांच्या पतीविरोधात हिंजवडी पोलिस स्टेशनमध्ये अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजय मकासरे यांना मारहाण करुन त्याच्याकडून पैसे उकळल्याचा आरोप तृप्ती देसाई आणि त्यांच्या पतीवर आहे.बालेवाडी येथील व्हीनस ग्रॅनाईडजवळ होंडा अमेज गाडीत तृप्ती देसाई सोबत जात होते. तेव्हा प्रशांत देसाई, सतीश देसाई, कांतीलाल गवारे आणि इतर दोघांनी अर्टिगा गाडीतून येऊन तक्रारदार विजय मकासरे यांच्यासमोर गाडी आडवी घातली. गाडी थांबवायला सांगून तृप्ती देसाईसह सर्वांनी लाकडी दांडक्याने आणि लोखंडी रॉडने मारहाण केली, असं विजय मकासरे यांनी सागितलं
कोणते गंभीर आरोप करण्यात आले आहेत
-भूमाता रणरागिणी ब्रिगेड बोगस संघटना
– तृप्ती देसाई लोकांची फसवणूक करत आहेत
-देसाई महिलांचा आधार घेऊन पुरुषांना फसवतात
– संघटनेच्या नावाखाली लोकांना ब्लॅकमेल करतात