काळा पैशांबद्दल या मेल आयडीवर कळवा

जर तुम्हाला कुठे काळ्या पैशाचा संशय आला किंवा माहिती असेल तर [email protected] या मेल आयडीवर काळ्या पैशाची माहिती नागरिकांनी सरकारला द्यावी असं आवाहन केंद्र सरकारनं आज केलं.

केंद्रीय महसूल सचिव हसमुख अधिया यांनी आज पत्रकार परिषद घेऊन हा ई मेलही जाहीर केला. [email protected] या मेल वर नागरिकांनी काही संशय आल्यास माहिती कळवावी असंही ते म्हणाले. तसंच बँकेतल्या सर्व व्यवहारावर सरकारची करडी नजर आहे.

त्याचबरोबर त्यांनी काळा पैसा जाहीर करण्याची आणखी एक योजना जाहीर केली. उद्या पासून ते 31 मार्च 2017 पर्यंत नागरिक काळा पैसा जाहीर करू शकतात. त्या पैशावर 50 टक्के टॅक्स आणि दंड लावण्याचीही तरतूद आहे.