मुख्यमंत्र्यांना वाढता विरोध, हिंगोलीत दाखवले काळे झेंडे

टीम महाराष्ट्र देशा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या महाजनादेश यात्रेवर आहेत. विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने ही यात्रा अतिशय महत्वाची मानली जात आहे. या यात्रेवर मुख्यमंत्री फडणवीस गेल्या ५ वर्षात केलेल्या कामांचा आढावा घेत आहेत. तर यात्रेद्वारे ते लोकांशी संवाद साधत आहेत.

दरम्यान सर्वत्र मुख्यमंत्र्यांचे जंगी स्वागत होत असताना आज काहीसा वेगळा प्रकार पहायला मिळाला. माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्या सडक-अर्जुनी गावात देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखविले आहेत. मुख्यमंत्री महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. त्यावेळी हा प्रकार घडला.

दरम्यान,फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेत कॉंग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांचा अडथळा येऊ नये यासाठी पोलिसांनी अटक केली होती. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या यात्रेत अतुल लोंढे जनतेच्या प्रश्नांवर निदर्शने करणार होते. त्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते.

जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी निघालेल्या मुख्यमंत्र्यांना आता ठिकठिकाणी विरोध होऊ लागला आहे. अनेक आश्वासनांची पूर्तता न झाल्यामुळे जनतेमध्ये आक्रोश वाढत आहे. तर दुसऱ्या बाजूला सरकारच्या या दडपशाहीचा तसेच पोलिसांच्या या कारवाईचा कॉंग्रेसकडून निषेध केला जात आहे.

मी जनतेचा जनादेश घ्यायला आणि हिशेब द्यायला यात्रेवर निघालोय : देवेंद्र फडणवीस

काँग्रेसच्या ‘या’ दिग्गज नेत्याने स्वीकारले मुख्यमंत्र्यांचे चॅलेंज

निष्ठावंताना न्याय द्या, आयारामांमुळे व्यथित शिवसैनिकांनी रक्ताने लिहिले पक्षप्रमुखांना पत्र

‘आमचे हे दिसत नाही, भाजपात गेले की काय?’ सोशल मीडियावर वायरल