उदगिरात पालकमंत्र्यांना काळे झेंडे दाखवले !

उदगीर/ प्रतिनिधी : लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या गुरूवारी ( दि. ३० ) उदगीर दौऱ्यात राष्ट्रीय वडार संघर्ष समितीच्या वतीने शिवाजी चौकात काळे झेंडे दाखवण्यात आले.

लातूर येथील अविनाश चव्हाण खून प्रकरणातील आरोपी हा पालकमंत्री यांचा माजी अंगरक्षक होता. पालकमंत्री संभाजी पाटील यांना उदगिरात पाऊल ठेवू देणार नाही असे निवेदन राष्ट्रीय वडार संघर्ष समितीच्या वतीने दि. १४ आॕगस्ट रोजी उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आले होते. तर पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली होती. गुरुवारी पालकमंत्री उदगिरात येत असल्याची खबर मिळाल्याने वडार संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष सुभाष कासले यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी पालकमंत्र्यांंना काळे झेंडे दाखवण्यात आल्याचे कासले यांनी सांगितले.

You might also like
Comments
Loading...