‘मराठा समजासाठी काळा दिवस ;अशोक चव्हाणांनी राजीनामा द्यावा’

ashok chavan

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाला आव्हान देणाऱ्या मराठा आरक्षणाच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्ट निर्णय दिलेला आहे. अॅड. जयश्री पाटील यांनी मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. त्यानंतर खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी पार पडली. मराठा समाजाला शैक्षणिक आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्याबाबत सुप्रीम कोर्ट काय निर्णय देणार, याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं होत.

आज १०:४५ मिनिटांच्या सुमारास कोर्टाने त्यांचा अंतिम निकाल जाहीर केला आहे. राज्य सरकारने बनवलेला मराठा आरक्षणाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून सुनावण्यात आला आहे. गायकवाड समितीच्या शिफारसी स्वीकारण्याजोग्या नाहीत, असं सर्वोच्च न्यायालयाकडून सांगण्यात येत आहे.

सुप्रीम कोर्टामध्ये आपली बाजू मांडताना राज्य सरकार पूर्णपणे कमी पडत आहे असे मत मागील अनेक दिवसांपासून शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे मांडत होते. त्यांनी या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर आता प्रतिक्रिया दिलेली आहे. ते म्हणाले कि,’आजचा हा निर्णय मराठा समजासाठी अतिशय दुर्दैवी आहे. याला सर्वस्वी जबाबदार राज्य सरकार व मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण आहेत त्यामुळे त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा. तसेच आता मराठे गप्प बसणार नाहीत, रस्त्यावर उतरतील, असा इशारा शिवसंग्रामचे विनायक मेटे यांनी दिला आहे.

तर ‘सुप्रीम कोर्टामध्ये आपली बाजू मांडताना राज्य सरकार पूर्णपणे कमी पडलेली आहे. त्यामुळेच आम्हला आजच्या या काळ्या दिवसाला सामोरे जावे लागत आहे. राज्यातील अतिशय संवेदनशील राजकीय आणि सामाजिक मुद्दा असलेल्या मराठा आरक्षणा प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयानं महत्त्वाचा निकाल दिला आहे. राज्य सरकारनं तयार केलेला मराठा आरक्षणाचा कायदा सर्वोच्च न्यायालयानं रद्द केला आहे.’ न्यायालयाचा हा निकाल दुर्दैवी असल्याची भावना मराठा क्रांती मोर्चा समन्वयक विनोद पाटील यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केलं असून राज्य सरकारचा कायदा रद्द केला आहे. तसेच गायकवाड समितीच्या शिफारशीही नाकारण्यात आल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे मराठा समाजाला मोठा धक्का बसला आहे.

महत्त्वाच्या बातम्या