fbpx

काळवीट प्रकरणात सलमानच्या जामिनावर सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशांची बदली

सलमान खान

टीम महाराष्ट्र देशा : काळवीट शिकार प्रकरणात जोधपूर कारागृहात असलेल्या अभिनेता सलमान खानच्या जामीनावरचं संकट कायम आहे. कारण दोन रात्री जेलमध्ये काढलेल्या सलमानच्या जामीनावर आज सुनावणी होणं अपेक्षित आहे. मात्र या जामीनावर सुनावणी करणारे न्यायाधीश आर के जोशी यांची बदली झाली आहे.

न्यायाधीश रवींद्र जोशी यांच्यासह ८७ न्यायाधीशांची बदली झाली आहे. ही नियमित बदली असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे सलमानच्या जामीनावरील सुनावणीचं संकट कायम आहे.