fbpx

पांढऱ्या दुधातले काळे बोके समोर येतील, खोतांचा शेट्टींंना टोला

राजू शेट्टींना

सांगली : अनुदान मिळाल्याने पूर्वी २३ रुपयाने खरेदी होणारे दूध २८ रुपयांनी खरेदी झाले पाहिजे. हे घडले नाही तर अनुदानावर व शेतकऱ्याच्या पैशावर डल्ला मारणारे पांढऱ्या दुधातले काळे बोके समोर येतील, असे मत कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

नेमकं काय म्हणाले सदाभाऊ ?

कोणाच्या दबावाने सरकारने दूध दराविषयीचा निर्णय घेतलेला नाही. यापूर्वीच दुधाच्या भुकटीवरील अनुदानाचा निर्णय झाला होता. त्याबद्दल अडचणी निर्माण झाल्याने आता खरेदी करणाऱ्या संघ व संस्थांना ५ रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता ५ रुपये वाढीव दर उत्पादकांना मिळाला पाहिजे. ज्यांनी यासाठी आंदोलन केले त्यांनी या गोष्टींवर लक्ष ठेवावे.

शेतकऱ्यांना दूधाचा योग्य दर आता मिळाला नाही तर शासकीय अनुदानावर संबंधितांनी डल्ला मारल्याचे स्पष्ट होईल. अशा लोकांवर काय कारवाई करायची याचा निर्णय सरकार घेईल, मात्र तोपर्यंत हे काळे बोके समाजासमोर येतील.

कट्टर काँग्रेसी कार्यकर्त्याला न्याय द्या अन्यथा आमचे राजीनामे घ्या !

‘जेडीयू’चं ठरलं ! २०१९च्या लोकसभा निवडणुकीत ‘एनडीए’ बरोबरच !