जितेंद्र आव्हाडांचे ‘गीता’यन, भाजप युवा मोर्चा उपाध्यक्ष आव्हाडांना भेट देणार भगवतगीता

पुणे: गीतेतील श्लोक म्हणताना चुकलेले राष्ट्रवादी कॉंग्रेस आमदार जितेंद्र आव्हाड यांना भाजप युवा मोर्चा उपाध्यक्ष राम सातपुते हे भगवदगीता भेट देणार आहेत, काल एका पत्रकाराने केलेल्या प्रश्नावर उत्तर देताना आव्हाड यांची भंबेरी उडाली आणि गीतेतील श्लोक म्हणताना ‘यदा यदा शी धर्मस्य’ असा उल्लेख केला होता. दरम्यान, काल दिवसभर याच घटनेची चर्चा प्रसारमाध्यमांत रंगली होती. आता आव्हाड यांनी गीतेचा अभ्यास करावा आणि न चुकता श्लोक म्हणावेत यासाठी त्यांना गीता भेट देणार असल्याचं सातपुते यांनी सांगितले.

आरोग्यम धनसंपदा आयुर्वेद सर्वासाठी

आरोग्यम धनसंपदा आयुर्वेद सर्वासाठी

मुंबईतील महाविद्यालयांमध्ये भगवदगीता वाटप करण्याचा निर्णय राज्याच्या शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आला. त्यावरून वाद सुरू झाला आहे. गीतेच वाटप करून भाजप शिक्षणाचे भगवीकरण करत असल्याचा आरोप कॉंग्रेस – राष्ट्रवादीकडून करण्यात येत आहे. याच विषयावर आव्हाड हे पत्रकारांशी बोलत होते.

यावेळी आपल्या आक्रमक शैलीसाठी प्रसिद्ध असणारे आव्हाड हे आपली आक्रमकता दाखवताना भगवतगीतेतील एक श्लोक म्हणताना अडखळले, ‘यदा यदा शी धर्मस्य’ असा उल्लेख त्यांनी केला. श्लोक म्हणताना चुकल्याने तिथे उपस्थित एका पत्रकाराने त्यांना श्लोक म्हणून दाखवा असे विचारले. पत्रकाराच्या प्रश्नाने चिडलेल्या जितेंद्र आव्हाड यांनी ‘तुम्ही भाजपचे प्रवक्ते म्हणून आलात का? असा प्रश्न केला तसेच खासगीत गीता म्हणून दाखवण्याचे आव्हान स्वीकारले.

Shivjal