महाविकास आघाडी सरकारच्या काळात सर्व अनागोंदी कारभार सुरू आहे : भाजयुमो

bjym

मुंबई- आघाडी राज्यसरकारच्या काळात सर्व अनागोंदी कारभार सुरू आहे. राज्यात कुठल्याही प्रश्नाला हे सरकार गांभीर्याने घेत नसल्याचे वारंवार उघडकीस आले आहे. मागील काही महिन्यांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात उद्भवत असलेल्या महिला, युवक , शेतकरी, विद्यार्थी , कोरोना चाचणी किट घोटाळा, शिष्यवृत्ती वाटप घोळ अश्या विविध प्रश्नांवर तोडगा काढण्याची मागणी करण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील व त्यांचे सहकारी सरचिटणीस राहुल लोणीकर, सुशील मेंगडे , शिवानी दाणी व प्रदेश युवती विभाग संयोजिका मीना केदार यांनी राज्यपालांची भेट घेतली.

या मागण्यांमध्ये प्रामुख्याने अल्पवयीन मुली, युवती व महिलांवरील होणाऱ्या अत्याचारा संबंधित फरार आरोपींना त्वरित अटक व्हावी , हे सर्व खटले फास्ट ट्रॅक कोर्ट मध्ये चालवावे व राज्यातील महिला आयोगाचे रिक्त अध्यक्ष पदावर अध्यक्ष त्वरित नेमावे. कोव्हिड सेंटर साठी त्वरित SOPs काढाव्यात. तसेच विद्यार्थांना परदेशी शिक्षण घेण्यासाठी अंतिम वर्षाच्या गुणपत्रिकेची अडचण येत असल्यामुळे ही अडचण दूर करण्यासंदर्भात राज्य सरकारने निर्णय करावा या मागण्यांचा समावेश आहे.

याशिवाय राज्यामध्ये मादिरालये, हॉटेल सुरू केलेत पण युवकांच्या हिताच्या व्यायाम शाळा अजूनही खुल्या करण्यात आलेल्या नाहीत त्या त्वरित खुल्या कराव्यात , रोजगार गमावलेल्या , रोजगार मिळवण्यासाठी ची प्रक्रिया पूर्ण झालेल्या पण प्रत्यक्षात रोजगार मिळू न शकलेल्या युवांना किमान १०००० रू प्रति महिना कोव्हिड भत्ता राज्य सरकार कडून मिळावा. कोव्हिड च्या RTPCR चाचणीच्या ज्या किट सदोष असल्याचे उघड झाले त्याची नैतिक जवाबदारी स्विकारून आरोग्य मंत्र्यांनी राजीनामा द्यावा तसेच या विषयातील संबंधित दोषींवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

नुकत्याच सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील आर्थिक दृष्ट्या मागास असलेल्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती यादी मध्ये दोन बड्या अधिकाऱ्यांच्या मुलांची नावे समाविष्ट आहेत. या प्रकरणी उच्चपदाचा दुरुपयोग झाला असण्याचे वृत्त एक वृत्त वाहिनीने प्रसारित केले होते. हे जर खरे असेल तर दोषींवर कारवाई करण्यात यावी. अश्या सर्व महत्वपूर्ण मागण्यांचे निवेदन या प्रसंगी राज्यपालांना देण्यात आले. या सर्व मागण्या त्वरित मान्य न झाल्यास आक्रमक पवित्रा घेतला जाईल असा इशाराही भारतीय जनता युवा मोर्चा चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी दिला.

महत्वाच्या बातम्या-