‘धनंजय मुंडे यांनी त्वरित राजीनामा द्यावा,अन्यथा भारतीय जनता युवा मोर्चा राज्यभर आंदोलने करणार’

dhananjay munde

मुंबई : आधी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख आणि आता मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप झाल्यानंतर ठाकरे सरकार चांगलंच अडचणीत सापडलं आहे. त्यातच विरोधी पक्ष भाजपने देखील आक्रमक पवित्रा घेत थेट धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केलीय. तसेच स्वतः धनंजय मुंडे किंवा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राजीनामा न घेतल्यास भाजप राज्यभर आंदोलन करत रस्त्यावर उतरेल, असाही इशारा देण्यात आलाय. त्यामुळे आता ठाकरे सरकार नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे

भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी या प्रकरणी आक्रमक भूमिका घेतली आहे. पाटील म्हणाले. धनंजय मुंडे यांनी त्वरित राजीनामा द्यावा,गुन्हा दाखल करून तपास सीबीआय कडे अथवा निवृत्त न्यायाधीश यांच्या कमिटी कडे सोपवावा अशी मागणी केली आहे. शर्मा भगिनींना संरक्षण द्यावे तसेच दोन पेक्षा जास्त अपत्य असल्याने आणि त्याचा उल्लेख निवडणूक प्रतिज्ञापत्रात न केल्याने त्यांचे सदस्यत्व रद्द व्हावे अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. तसेच द्विभार्या प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन केले असल्यास कार्यवाही व्हावी अन्यथा भारतीय जनता युवा मोर्चा राज्यभर निषेध आंदोलने करणार असा इशारा त्यांनी दिला आहे.

दरम्यान, धनंजय मुंडे यांच्या प्रकरणाची मुंबई पोलिसांनी निपक्षपातीपणे चौकशी करावी.पोलिसांनी कोणत्याही राजकीय दबावाला बळी पडू नये.कितीही मोठा नेता असुदे दोषींना पाठिशी घालू नका.जोपर्यंत संपूर्ण तपास पूर्ण होत नाही तोपर्यंत धनंजय मुंडे यांना मंत्रीपदापासून दूर ठेवले पाहिजे. अशा मोठ्या घटनांमध्ये पीडिता व तिच्या कुटुंबियांवर दबाव येऊ शकतो.पुराव्यांमध्ये छेडछाड होऊ शकते.तपास कार्यात अडथळे निर्माण होऊ शकतात. नैतिकता दाखवत धनंजय मुंडे यांनी आपल्या पदावरून पायउतार व्हावं असं भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या