मराठा आरक्षणासाठी भाजपच्या युवा मोर्चा उपाध्यक्षाचा राजीनामा

Indrajit Salunke

मराठा समाजाला आरक्षण न दिल्यामुळे भाजपमध्ये राजीनामास्त्र सुरु झालं आहे. उस्मानाबाद भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष इंद्रजित देविदास साळुंके यांनी राजीनामा दिला आहे. सत्तेत आल्यानंतर पक्षाने मराठा समाजाला आरक्षण देण्याचं वचन दिलं होतं. मात्र ते अद्याप पूर्ण केलेलं नाही. जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांच्याकडे इंद्रजित देविदास साळुंके यांनी राजीनामा सोपवला.

Indrajit Salunkeइंद्रजित देविदास साळुंके यांची फेसबुक पोस्ट 

मी आज आतिशय खिन्न मनाने ऐक निर्णय घेतला तो बरोबर आहे का चुकीचा आहे हे मला समजत नाही परंतु काळजावर दगड ठेऊन माझ्या भा.ज.यु.मो जिल्हा उपाध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे कारण की मराठा आरक्षण या साठी गेली 25ते 30 वर्षा पासुन मराठा समाज आरक्षणा साठी संघर्ष करत आहे. या 25ते 30 वर्षाच्या कालखंडा मध्ये जवळ जवळ 20 वर्ष तरी मराठा समाजाचा मुख्यमंत्री तसेच जास्ती जास्त कँबिनेट व राज्यमंत्री हे मराठा समाजाचेच होते त्या सर्वांनी जर त्याच वेळे पासून आरक्षण मसुद्यातील त्रुटींची पुर्तता करण्याचा प्रयत्न केला आस्ता तर आरक्षण कोर्टात टिकले आस्ते परंतु त्यांना ते करायचेच नव्हते म्हणून आरक्षणाचा मुद्दा आणखिही प्रलंबीतच आहे .2015/16 च्या विधानसभा निवडणूकीच्या वेळी माझ्या पक्षाने मराठा समाजास आरक्षण देणार आसे जाहिर केले होते.तोच मुद्दा घेऊन आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ते जनमानसात फिरलो व जनतेने त्यावर विश्वास ठेऊन भरभरून मताच दान ही दिल .आता तीच जनता जाब विचारत आहे .म्हणून मी एक मराठा या नात्याने मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे.
तसेच सर्व पक्षीय मराठा बांधवांना विनम्र आव्हाण करतो की आपल्याला खरोखरच समाजा विषयी आभिमान गर्व आसेल तुमच्या अंगात जर खर्या मराठ्याचे रक्त सळसळत आसेल तर आपण कोणत्याही पक्षाचे पदाधिकारी आसाल नगरसेवक,पंचायत समिती सदस्य,जि.प सदस्य,आमदार,खासदार सर्वांनी मराठा आरक्षण मागणीसाठी आपापल्या पदाचे राजीनामे द्यावेत त्या मुळे आख्खा देश ढवळुन निघेल न्याय पालिका देखिल आरक्षणाचे गांभिर्य ओळखुन निर्णय देईल .