कुमार केतकरांचा राज्यसभेचा मार्ग मोकळा; भाजपच्या विजया रहाटकर यांची माघार

टीम महाराष्ट्र देशा: भाजपकडून विजया रहाटकर यांच्या राज्यसभेसाठीच्या उमेदवारीमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांची डोकेदुखी वाढली होती. राज्यसभा निवडणुकीतून भाजपच्या उमेदवार आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी आपला अर्ज मागे घेतला असून राज्यसभेची निवडणूक आता बिनविरोध होणार आहे.

राज्यसभा निवडणुकीतून भाजपच्या उमेदवार आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी आपला अर्ज मागे घेतल्यामुळे ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांचा मार्ग आता मोकळा झाला. भाजपकडून राज्यसभेसाठी जास्तीचा उमेदवार देऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादीची कोंडी करण्याचा प्रयत्न केला होता.

आज अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत होती आणि विजया रहाटकर यांनी आपला अर्ज मागे घेतला. रहाटकरांनी अर्ज मागे घेतल्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होणार हे स्पष्ट झालंय. विशेष म्हणजे याचा सर्वात जास्त फायदा हा ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांना होणार आहे.