fbpx

‘या’ प्रदेशात चक्क मतदानापूर्वीच झालाय भाजपचा विजय

bjp-flag-representational-image

टीम महाराष्ट्र देशा – भारतीय जनता पक्षाने चक्क मतदानापूर्वीच तीन जागा मिळवून पुन्हा एकदा आपला जोश दाखवून दिला आहे.  अरुणाचल प्रदेशात भाजपने मतदानापूर्वीच तीन जागा मिळवत आपल्या लोकसभा निवडणुकीच्या अभियानाला सुरुवात केली आहे.

गुरुवारी भाजपने येथे झालेल्या तीन विधानसभा निवडणुकीत बिनविरोध विजय मिळवला आहे. निवडणूक आयोगाने दिरांग, यचूली आणि आलो ईस्ट मतदार संघाचे निकाल घोषीत केले आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त केंगी दरांग यांनी सांगितले की, आलो ईस्ट विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे केंटी जिनी यांनी बिनविरोध निवडणूक लढवली. त्यांच्याविरुद्ध काँग्रेसचे मिनकिर लोलेन यांनी अर्ज दाखल केला होता. परंतु, मंगळवारी तपासणीनंतर त्यांचा नामांकन अर्ज रद्द करण्यात आला आहे. तसेच दिरांग मतदार संघातून काँग्रेसचे उमेदवार शेरिंग ग्युरमे आणि अपक्ष उमेदवार गोम्बू शेरिंग यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहे. त्यानंतर भाजपचे फुरपा शेरिंग यांना विजयी घोषित करण्यात आले. या व्यतिरिक्त यचुली विधानसभा मतदार संघातून ताबा तेदीर यांनी बिनविरोध विजय मिळवला आहे.

 

2 Comments

Click here to post a comment