नाचता येईना अंगण वाकडे; भाजपचा विजय ईव्हीएममुळे – कॉंग्रेस

टीम महाराष्ट्र देशा- कानडी जनतेने भाजपच्या बाजूने कौल दिला आहे. मोठ्या मनाने पराभव मान्य करायचं सोडून कॉंग्रेस नेते मोहन प्रकाश यांनी ईव्हीएमवर शंका उपस्थित केली आहे.

नेमकं काय म्हणाले
भारतातल्या सर्वच पक्षांनी ईव्हीएमवर आतापर्यंत आक्षेप घेतलेला आहे, विरोधात असताना भाजपनेही आक्षेप घेतला होता, आता सर्वच पक्ष ईव्हीएमवर शंका उपस्थित करत आहेत, मग बॅलेट पेपरने निवडणूक घ्यायला भाजपला काय हरकत?

दरम्यान,कर्नाटक निवडणुकीचे निकाल आज जाहीर होत असून, आतापर्यंत हाती आलेल्या निकालावरून भाजपला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. तर कॉंग्रेसची मात्र पीछेहाट झाली आहे. दरम्यान कर्नाटकात लिंगायत मतदारांचा प्रभाव असलेल्या मतदारसंघात भाजपा सर्वाधिक जागांवर आघाडीवर आहे. लिंगायत मतदारांचा प्रभाव असलेल्या २९ जागांवर भाजपा आघाडीवर आहे. काँग्रेस त्या तुलनेत बरीच पिछाडीवर पडली आहे. लिंगायत मते निर्णयाक असलेल्या मतदारसंघात काँग्रेस ९ आणि जनता दल सेक्युलर सहा जागांवर आघाडीवर आहे.

दरम्यान कर्नाटक निवडणुकीपूर्वी कॉंग्रेसने लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्मची मान्यता देण्यात यावी अशी शिफारस केंद्र सरकारकडे केली होती यावरून प्रचंड राजकारण करण्यात आले होते मात्र या मुद्यावरही लिंगायत समाजाचे मत आपल्याकडे ओळवण्यात कॉंग्रेसला अपयश आले. काँग्रेसने ४९ लिंगायत आणि ४६ वोक्कालिगाना उमेदवारी दिली आहे तर भाजपाचे ६८ लिंगायत आणि ३८ वोक्कालिगाना संधी दिली आहे. जेडीएसने ४१ लिंगायत आणि ५५ वोक्कालिगाना उमेदवारी दिली आहे

You might also like
Comments
Loading...