भाजप आमदाराचा अजब दावा; आयकार्ड दाखवा आणि टोलमाफी मिळवा

टीम महाराष्ट्र देशा : भाजपचे सरचिटणीस सुरेश हाळवणकर यांनी’ भाजपचे ओळखपत्र असणाऱ्या वाहनचालकांकडून टोल घेतला जात नाही. कारण आयकार्डवर बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांचा फोटो आहे,’ असे वादग्रस्त विधान केले आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

सुरेश हाळवणकर यांनी मिरज येथील भाजप बूथ प्रमुखांच्या मेळाव्यात बोलताना अस विधान केले आहे. त्यामुळे टोल वसूल करताना एका ठराविक पक्षाचा कार्यकर्ता आहे म्हणून सवलत मिळत असेल तर हा पक्षपातीपणा नाही का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. जर खरच अशा घटना घडत असतील तर याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.

दरम्यान, पक्षाच्या आमदारानेच हा धक्कादायक दावा केल्याने भाजपवर टीका होत आहे. कारण त्यांनी थेट बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांचा उल्लेख करत हा दावा केला आहे.