‘संविधान’ बचाव रॅलीला भाजपची ‘तिरंगा’ रॅली देणार उत्तर: रावसाहेब दानवे

danave

मुंबई : कोरेगाव भीमा येथे झालेली दंगल एक मोठ षडयंत्र होत असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. सरकारचा विकास पाहून भाजप आणि सरकारला बदनाम करण्याचा काही मंडळींचा डाव आहे. विरोधकांच्या संविधान बचाव रॅलीला 26 जानेवारीला प्रत्येक जिल्ह्यात तिरंगा रॅली काढून उत्तर दिलं जाईल असं, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सांगितलं ते आज मुंबईत भाजप कार्यकारिणीची बैठकी दरम्यान बोलत होते.

Loading...

रावसाहेब दानवे, म्हणाले आज झालेल्या बैठकीत पक्षाच्या संघटनात्मक ध्येयधोरणवर आज चर्चा झाली. तसेच कोरेगाव भीमा विषयावर कार्यकर्त्यांना सौहार्दपूर्ण वातावरण ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आमचा विकास पाहून भाजप आणि सरकारला बदनाम करण्याचा कट काही मंडळींचा आहे. विरोधकांच्या संविधान बचाव रॅलीला भाजपची तिरंगा रॅलीने उत्तर देण्यात येईल. त्यासाठी २६ जानेवारीला प्रत्येक जिल्ह्यात तिरंगा रॅली काढणार असल्याच दानावेंनी सांगितेले.Loading…


Loading…

Loading...