भाजपच्या ‘या’ दिग्गज नेत्याला झाला कोरोना, संपूर्ण मंत्रीमंडळावर होम क्वारंटाइन होण्याची वेळ

flage of bjp

नवी दिल्ली : देशात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या पहिल्या १० देशांच्या यादीत भारत सातव्या क्रमांकावर पोहोचला आहे. सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील झाले असताना आता अनेक नेते आणि सेलिब्रेटी देखील या विषाणूच्या विळख्यात अडकत आहेत.

भाजपचे उत्तराखंडमधील कॅबिनेट मंत्री सतपाल महाराज यांना कोरोनाची लागण झाली आहे. सतपाल महाराज यांचे रिपोर्ट कोविड-19 पॉझिटिव्ह आल्यानंतर संपूर्ण मंत्रीमंडळावर होम क्वारंटाइन होण्याची वेळ आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

हा रिपोर्ट समोर येण्याआधी सतपाल महाराज मंत्रिमंडळाच्या बैठकीला एक दिवस आधी उपस्थित होते. रविवारी त्यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. त्यांच्या निवासस्थानी काम करणाऱ्या 17 जणांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे.

दरम्यान, भारतामध्ये रविवारी रात्रीपर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार कोरोनाचे १ लाख ९० हजार ६०९ रुग्ण आहेत. यासोबत भारताने फ्रान्सला मागे टाकलं आहे. फ्रान्समध्ये करोनाचे १ लाख ८८ हजार ८८२ रुग्ण असून भारताने फ्रान्सला मागे टाकलं असून नवव्या क्रमांकावरुन सातव्या क्रमांकावर पोहोचला आहे.

पहिल्या क्रमांकावर अमेरिका अद्याप कायम असून अमेरिकेत करोनाचे १८ लाख रुग्ण आहेत. यानंर ब्राझील आणि रशियाचा क्रमांक आहे. ब्राझीलमध्ये करोनाचे पाच लाख तर रशियात करोनाचे चार लाख रुग्ण आहेत.

…तर ही वेळ आली नसती; अमित शाहांची कबुली

गोड बातमी : हार्दिक-नताशा होणार आई-बाबा

पोलिसांना प्राथमिक सुविधा मागणाऱ्या हवालदाराची केली बदली ?