भाजपचा ‘टॅम्परिंग बॉल’ २०१९ ला स्विंग होणार नाय; राज ठाकरेंचे फटकारे

raj thakare

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा आपल्या कुंचल्यातून नरेंद्र मोदी आणि अमित शाहांवर फटकारे ओढले आहेत. सध्या बॉल टॅम्परिंगचं प्रकरण सध्या चांगलंच चर्चेत आहे. त्याचाच संदर्भ घेऊन राज ठाकरेंनी मोदी-शाहांवर निशाणा साधला आहे.

राज ठाकरे यांनी दिल्लीच्या ड्रेसिंगरुम मधील चर्चा! असा मथळा देऊन २०१४ चे जुमले २०१९ ला चालतील असं वाटत नाही अशी चर्चा करतानाचं व्यंगचित्र राज ठाकरेंनी रेखाटलं आहे. राज ठाकरेंनी व्यंगचित्रात गोतमभाईला सांगून ओस्ट्रेलियासून पोलिस पेपर मांगवून घासून पायला, पन हे बोल पुना २०१९ मदी स्विंग होएलयं वाटात नाय! असं म्हणत दिल्लीत ड्रेसिंग रुममध्ये पंतप्रधान मोदी आणि अमित शाह चर्चा करतांना दाखवले आहे.

काय आहे बॉल टॅम्परिंग प्रकरण?

ऑस्ट्रेलियाच्या कॅमेरुन बॅनक्रॉफ्टला केपटाऊन कसोटीत चेंडू अवैधरित्या हाताळताना टेलिव्हिजन कॅमेराने रंगेहाथ पकडलं. या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी बॅनक्रॉफ्टने खिशातून सँडपेपर काढून, आधी चेंडू त्या सँडपेपरने घासला आणि मग तो सँडपेपरचा तुकडा पुन्हा आपल्या पँटच्या आत दडवला. हे पूर्ण दृश्य टेलिव्हिजन कॅमेराने टिपल्याने बॅनक्रॉफ्टला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्यात आलं.