ठाकरे सरकाने केलेल्या कर्जमाफी विरोधात भाजपचे राज्यभर ठिय्या आंदोलन

औरंगाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने केलेल्या कर्जमाफी विरोधात राज्यभरात कुठे धरणे आंदोलन तर कुठे ठिय्या आंदोलन सुरु झाले आहे. तर शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन हेक्टरी पंचवीस हजार रुपये व फळबागांसाठी पन्नास हजार रुपये देण्याच्या आश्वासनाचा विसर पडला का? असा सवाल औरंगाबादेत भाजपने केला आहे.

शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी, महिलांवरील वाढते अत्याचार यासह विविध मागण्यांसाठी भाजपने आज राज्यभरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडले. यावेळी सरकारविरोधी घोषणा देत पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आपला संताप व्यक्त केला. औरंगाबादेत भाजपच्या कार्यकर्त्यांनी मुख्यंमत्री उध्दव ठाकरे यांच्यावर निशाणा साधतांना त्यांना शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांचा विसर पडल्याचा टोला लगावला. तर शेतकऱ्यांना पिकांची नुकसान भरपाई, सरकट कर्जमाफी, महिलांवरील वाढते अत्याचार या मुद्द्यावरून विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेत सरकार विरोधात धरणे आंदोलन सुरू केले आहे.

Loading...

नागपूर येथे या सरकारने कर्जमाफीची घोषणा केली होती; मात्र त्याचा लाभ अजूनही मिळालेला नाही. सातबारा कोरा करण्याचे आश्वासनदेखील या राज्य सरकारने पाळले नाही. अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना २५ हजार रुपये आर्थिक मदत देण्याचं जाहीर केलं होते, ती मदतही अद्याप मिळालेली नाही.असा आरोप करत भाजपने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या प्रमुखांनाही धारेवर धरले. सरकारने दुटप्पी भूमिका सोडून शेतकरी व सर्वसामान्यांना न्याय द्यावा अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

'नवे रुग्ण न आढळल्यास 'हे' राज्य '७ एप्रिल'पर्यंत कोरोनामुक्त होण्याची शक्यता'
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
कोरोनाविरोधात लढण्यासाठी रिलायंस कंपनीने घेतला 'मोठा' निर्णय; केली तब्बल 'इतक्या' कोटींची मदत
#Corona : कनिका कपूरचा चौथा रिपोर्टही पॉझिटीव्ह, इंस्टा अकाऊंटवरून केली भावनिक पोस्ट
दारुड्यांसाठी अत्यंत वाईट बातमी...दुकाने सुरु होण्यासाठी पहावी लागणार आणखी वाट
सावधान ! कोरोनाचे नवे केंद्र झोपडपट्टीत, अनेकजण सापडले कोरोनाबाधित
कोरोना ( कोव्हिड-१९ ) संसर्गाची भिती कोणाला ?
'धन्यवाद अजित पवार! शेवटी अनुभवाचं महत्व तुम्ही दाखवून दिलं; बाकीचे फेसबुक लाईव्हमध्ये व्यस्त'
महाराष्ट्रातील ‘या’ शहरात वाढला कोरोनाग्रस्तांचा झपाट्याने आकडा, सात महिन्यांच्या बाळाचाही समावेश
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?