जीएसटी कोसळणार! भाजप नेत्याच वक्तव्य

नवी दिल्ली: भाजपचे वरिष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. जीएसटी कोसळणार, व्यापारी रस्त्यावर उतरणार अशे बोलत स्वपक्षाला घरचा आहेर दिला आहे.

सुब्रमण्यम स्वामी यांनी याबाबत एक ट्विट केले आहे. सुब्रमण्यम स्वामी, म्हणाले जीएसटी कोसळण्याच्या जवळ आहे. व्यापाऱ्यांनी जमा केलेल्या रकमेमुळे आयसीआयसीआय आणि एचडीएफसी या बँका गब्बर होत आहेत. यामुळे विरोधकांना आता आयता मुद्दा मिळाला आहे.

यापूर्वी देखील सुब्रमण्यम स्वामी यांनी जीएसटी चा विरोध केला होता. जीएसटी नेटवर्कच्या ( जीएसटीएन) अपयशामुळे जीएसटी पूर्णपणे फ्लॉप झाला आहे. जीएसटीएनमुळे खासगी आणि परदेशी बँकांचा मोठा फायदा होत आहे. जीएसटीद्वारे जमा झालेला कर हा एचडीएफसी आणि आयसीआयसीआय बँकांच्या खात्यामध्ये जात आहे’, असा आरोप सुब्रमण्यम स्वामी यांनी केला होता.

You might also like
Comments
Loading...