पंढरपूर पोटनिवडणुकीच्या प्रचारात आचार्य तुषार भोसलेंसह भाजपाची आध्यात्मिक आघाडीही उतरणार

तुषार भोसले

पंढरपूर – पंढरपूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचं २८ नोव्हेंबर रोजी निधन झालं. भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. यासाठी १७ एप्रिलला मतदान होणार असून २ मे रोजी मतमोजणी होणार आहे.

राष्ट्रवादीकडून दिवंगत भारत नाना भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे. तर, भाजपने भगीरथ भालके यांच्या विरोधात समाधान आवताडे मैदानात उतरवलं आहे. भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यात मुख्य सामना होणार आहे.

दरम्यान,भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या आदेशानुसार भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले हे भाजपा उमेदवाराच्या प्रचारार्थ दि. ०७ एप्रिल ते 14 एप्रिल २०२१ या कालावधीत पूर्णवेळ पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघात तळ ठोकून असणार आहेत.

यादरम्यान वारकरी महामंडळाचे अध्यक्ष प्रकाश महाराज जवंजाळ, धर्माचार्य समन्वयक भाऊ महाराज फुरसुंगीकर, तीर्थक्षेत्र व देवस्थाने समन्वयक राजेश महाराज देगलूरकर, पश्चिम महाराष्ट्र संयोजक संजय घुंडरे पाटील, प्रदेश कार्यकारिणी सदस्य बबनराव मुठे, नंदू महाराज रणशूर आदींसह आघाडीचे अन्य पदाधिकारी देखील प्रचारासाठी येणार आहेत.

महत्वाच्या बातम्या