‘लोकसभा २०१९’ निवडणुकीत भाजपाच्या जागा कमी होतील, पण…!- रामदास आठवले

नवी दिल्ली: जोपर्यंत समोर राहुल गांधी आहेत, तोपर्यंत नरेंद्र मोदींचा विजय हा निश्चित आहे, रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी स्पष्ट केले. आगामी लोकसभा निवडणुकींमध्ये भाजपच्या जागा कमी होतील, पण! भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी निश्चितपणे सरकार स्थापन करेल. असे आठवले म्हणाले.

यापूर्वी रामदास आठवले यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत, आगामी निवडणुकीत भाजपच्या जागा कमी होण्याची शक्यता असून राजस्थानमध्ये भाजपला फटका बसू शकतो. तर, उत्तर पूर्वच्या तिन्ही राज्यात भाजपची सत्ता येईल असे भाकीत व्यक्त केले होते. मात्र तरीही अडीचशे जागा मिळवून केंद्रात भाजप पुन्हा सत्तेत येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.