माझा पराभव पक्षात आलेल्या बड्या नेत्यांमुळे झाला – राम शिंदे

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीत लक्षवेधी टक्कर होती ती म्हणजे राष्ट्रवादीचे नेते, शरद पवार यांचे नातू रोहित पवार आणि भाजपचे जेष्ठ नेते राम शिंदे यांच्यामध्ये लढत होती. तसेच या लढतीकडे साऱ्या राज्याचे लक्ष्य लागले होते. मात्र रोहित पवार यांनी दणदणीत विजय मिळवला. परंतु भाजप नेते राम शिंदे यांना पराभवाला सामोरे जावे लागले.

याचाच धागा पकडत भाजप नेते राम शिंदे यांनी भाष्य केलं आहे. ते कर्जत-जामखेड येथे बोलत होते. यावेळी बोलत असताना शिंदे यांनी पक्षावरची देखील नाराजी बोलून दाखवली. ते म्हणाले, ‘विधानसभा निवडणुकांपूर्वी पक्षात आलेल्या बड्या नेत्यांचा पक्षाला काही फायदा झाला नाही, असे शिंदे म्हणाले.

पुढे बोलताना शिंदे यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. याबाबत बोलताना ते म्हणाले की, माझा पराभव पक्षात आलेल्या बड्या नेत्यांमुळे झाला. यामुळे भाजपमध्ये अंतर्गत धुसफूस दिवसेंदिवस वाढू लागल्याचे चित्र दिसू लागले आहे, असे ते म्हणाले.

दरम्यान, विखे पाटील आल्यामुळे जागा कमी झाल्या हे आपण पुराव्यानिशी पक्षाच्या निदर्शनास आणून दिलं आहे. तसेच पक्ष आपल्या म्हणण्याचा गांभीर्याने विचार करेल अशी आशा आहे, असे ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या