आतापर्यंतचं हे सर्वात गोंधळलेलं सरकार; विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांची टीका

मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून म्हणजेच उद्यापासून सुरू होत आहे. राज्याची आर्थिक स्थिती, अर्थसंकल्प, शेतकरी कर्जमाफी या मुद्द्यांवर अधिवेशनात चर्चा होईल. तसेच सीएएविरोधातील आंदोलनं, एल्गार प्रकरणाचा तपास, कोरेगाव- भीमा या मुद्द्यांवर सत्ताधारी तसंच विरोधी दोन्ही बाजूंकडील सदस्य आक्रमक होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच हे अधिवेशन चांगलेच गाजणार असल्याची चर्चा आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर भाजपची पत्रकार परिषद मुंबई येथे पार पडली. या पत्रकार परिषदेदरम्यान माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माविकास आघाडी सरकारला लक्ष्य केलं. आतापर्यंतचं हे सर्वात गोंधळलेलं सरकार असल्याचं फडणवीस यावेळी बोलताना म्हणाले.

Loading...

राज्यात भाजपला डावलून शिवसेना, राष्ट्रवादी व कॉंग्रेस हे तीन पक्ष मिळून महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. सरकार स्थापन येऊन तीन महिने झाले आहेत. याबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘आतापर्यंत नव्या सरकारला सूर गवसलेला नाही,’ असा टोला फडणवीसांना ठाकरे सरकारवर लगावला आहे.

दरम्यान, हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी ठाकरे सरकारने केलेल्या कर्जमाफीवर देखील फडणवीस यांनी निशाणा साधला. ‘कर्जमाफी नाही आणि मुक्तीही नाही,’ असे ते म्हणाले. ‘जाहीरनाम्यातील एकही आश्वासन पूर्ण केलेलं नाही, तसेच कर्जमाफीच्या मुद्यावरून शेतकऱ्यांची फसवणूक सुरू असल्याचा आरोप त्यांनी राज्य सरकारवर केला.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
चीनने पाकिस्तानची केली क्रूर चेष्टा; N-95 मास्क ऐवजी चक्क अंडरवेअर पासून बनविलेले मास्क पाठवले
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
तळीरामांना दारूवाचून राहावेना; पठ्ठ्यांनी 'यूट्यूब'वर पाहून घरीच तयार केली दारू
आज सांयकाळी आणि उद्या सकाळी दुध मिळणार नाही कारण.....
कोरोनामुळे उद्धव ठाकरे सरकारचे भवितव्य टांगणीला ; वाचा 'काय' आहे प्रकरण
निलंग्यातील मज्जीदमधून १२ परप्रांतीय पोलिसांच्या ताब्यात !
अमेरिकेत 'कोरोना'चं थैमान; डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींकडे मागितला 'मदतीचा हात'
... तर 'लॉकडाऊन'चा कालावधी वाढवावा लागेल; राजेश टोपे यांची माहिती